
नागरिकांनी जवानाला केला सलाम…
अमळनेर : चार महिन्यानंतर आपल्या मुलीच्या वाढदिवसाला आलेल्या अमळनेर तालुक्यातील ढेकू सिम गावाचे फौजी शांताराम प्रताप भिल सोनवणे याना युद्धजन्य परिस्थितीमुळे पुन्हा कर्तव्यावर परतावे लागले आहे.

शांताराम सोनवणे सुट्टीवर आले. मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्त होते. सहकुटुंब वाढदिवस साजरा करावा या निमित्ताने सुट्टीवर आले घरी पोहचले. परंतु त्यांना वरिष्ठांचा फोन आला की युद्धजन्य परिस्थितीमुळे तुम्हाला परत यावा लागेल ड्युटी जॉईन करावी लागेल. मुलीचा वाढदिवस सांगितल्यावर अधिकारी म्हणाले की, आधी देश सांभाळणं गरजेचे आहे. आलेल्या आदेशाचे पालन करून शांताराम प्रताप सोनवणे हे परत कर्तव्यावर निघाले. जातांना माजी सैनिक शरद पाटील यांनी जागेवर केक आणून मुलीच्या वाढदिवस साजरा केला आणि शांताराम भिल हे ड्युटी साठी पुन्हा तैनात झाले घरी येऊन त्यांना फक्त चार तास झाले होते खरच अभिमान वाटावा अश्या देश भक्ताची ही माहिती माजी सैनिक शरद पाटील यांनी सामाजिक कार्यकर्ता मनोज शिंगाणे यांना कळवली. शांताराम सोनवणे या देशभक्ताला अनेक नागरिकांनी मानाचा मुजरा केला आहे. देशाच्या सेवेत अमळनेर तालुक्याचाही वाटा असेल म्हणून अमळनेरकरांचा ऊर स्वाभिमानाने भरून आला.



