
सामाजिक कार्यकर्त्यांची मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी
अमळनेर(प्रतिनिधी):- बसस्थानक समोरील भागवत रोडवरील लोखंडी अडथळे काढण्याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे.

अमळनेर युवा मित्र परिवाराच्या हे निवेदन दिले असून यात म्हटले आहे की करतो की, भागवत रोडवर बसस्थानक समोर नगरपालिकेने सामान्य नागरिकांचा रहदारीचा रस्ता लोखंडी अडथळे टाकून बंद करून ठेवला आहे. भागवत रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश असूनही पालिका अतिक्रमण धारकांना संरक्षण देत आहे. लोखंडी अडथळे लावल्यामुळे अतिक्रमण धारकांना एकप्रकारे सहकार्य करीत आहेत. त्याचप्रमाणे काही फळ विक्रेते, हातगाडी चालक है देखील रस्त्यावर गाड्या लावून पायी चालणाऱ्याऱ्यांना देखील अडथळे निर्माण करतात. अवैध प्रवासी वाहतूक करणारे देखील या रस्त्यावर वाहने उभी करतात. या भागात वाहतूक पोलीस देखील नसल्याने नागरिक असुरक्षित झाले आहेत.

बसस्थानक परिसरात सकाळी ७ ते १२ व दुपारी ४ ते ७ या वेळेत वाहतूक पोलीस नियुक्त करावे, तसेच फळविक्रेते, अवैध प्रवासी वाहतूक करणारे या भागात आरडाओरड करत असल्याने शाळा महाविद्यालयात जाणाऱ्या मुली, तरुणी, विद्यार्थिनी, महिला यांना या भागातून जातांना असुरक्षित जाणवत असते,तरी नागरिकांच्या वाहतुकीचा रस्ता अडवणे कायद्याने गुन्हा आहे. तरी पालिकेने दोन दिवसात लोखंडी बॅरिकेट्स काढावेत अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला.
निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते सागर विसपुते, चंद्रकांत कंखरे, मुकेश चौधरी, भावेश साळुंखे,सागर वाघ, सुशांत संदनशिव, राहुल कंजर,जयेश मालपुरे,अविनाश चौधरी , राज लाड,आशिष अंधारे, मनोज शिंगाणे,योगेंद्र बाविस्कर यांच्या सह्या आहेत.




