
अमळनेर:- तालुक्यातील जळोद येथील चि.प्रथमेश कुसुंबे याने इ.१० वी शालांत परिक्षेत घवघवीत यश मिळवले आहे.

फेब्रुवारी / मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इ.१० वी सी.बी.एस.ई. बोर्ड परिक्षेत चि. प्रथमेश याने ९४.२० % गुण मिळवित घवघवीत यश संपादन केले आहे. प्रथमेश हा अमळनेर येथील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी असून त्याने ९४.२० % गुणांसह शाळेतून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला आहे. तो प्राथमिक शिक्षक श्री .शरद भोई यांचा चिरंजीव असून त्याच्या या यशाबद्द्ल सर्वत्र कौतुक होत आहे. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर योग्य नियोजन व कठोर परिश्रम घ्यावे लागतात असे मत त्याने व्यक्त केले.





