
अमळनेर:- शहरातील गलवाडे रस्त्यावरील मंगल कार्यालयासमोर लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना १९ रोजी घडली आहे.

शहरातील साने नगर भागातील रहिवासी नाना देविदास पाटील हे १९ रोजी रात्री ९ वाजता कामानिमित्त गलवाडे रस्त्यावरील ठगूबाई रिसॉर्ट येथे गेले होते. त्यावेळी त्यांनी त्यांची २० हजार रुपये किमतीची स्प्लेंडर क्रमांक जीजे ०५ एफ व्ही ००५१ रिसॉर्ट समोर लावली होती. १० वाजता ते परत आले असता दुचाकी दिसून आली नाही. त्यामुळे त्यांनी मित्रांना बोलवून आजुबाजूला परिसरात शोध घेतला असता कोणताही तपास न लागल्याने दुचाकी चोरीला गेल्याची खात्री झाली. त्यामुळे त्यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध अमळनेर पोलिसांत तक्रार दिली असून पुढील तपास हेकॉ चंद्रकांत पाटील हे करीत आहेत.





