
अमळनेर(प्रतिनिधी):- अमळनेर ते टाकरखेडा दरम्यान एकाने रेल्वे रुळावर आत्महत्या केल्याची घटना २२ रोजी सकाळी ९.३० वाजता घडल्याचे उघडकीस आले असून अमळनेर पोलिस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अमळनेर ते टाकरखेडा दरम्यान रेल्वेरुळावर ३० ते ३२ वर्षाच्या पुरुषाचा मृतदेह आढळून आला.खानदेश एक्सप्रेस जात असताना रेल्वेरुळावर झोपून या अज्ञात इसमाने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.टाकरखेडा स्टेशन मास्तर अनुराग कनोजिया यांच्या खबरीवरून अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास पो.ह. लक्ष्मीकांत शिंपी करत आहेत.





