
शटर तोडून अग्निशमन दलाचे आग विझवण्यासाठी प्रयत्न…
अमळनेर : नगरपरिषदेसमोरील ३ ते ४ दुकांनाना सकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. तातडीने जवळच असलेला अग्निशमन बंब मागवण्यात आला. दुकाने बंद होती आणि आतून आग लागल्याने आग विझवण्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या.

शॉर्ट सर्किट ने आग लागली असावी असा अंदाज असून कटलरी ,पाण्याचे जार , भांडे असे साहित्य जळून खाक झाले आहे. आग विझवण्यासाठी पालिकेचे जेसीबी मागवून दुकानांचे शटर तोडण्यात आले. पालिकेचे आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांना देखील मदतीला बोलावण्यात आले. आजूबाजूच्या दुकानांना आग लागण्यापासून वाचवण्यात आले.

दरम्यान आग विझवण्यासाठी मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या आदेशाने अग्निशमनाधिकारी गणेश गोसावी कर्मचारी,फारुक शेख जफर पठाण ,वसीम पठाण आनंद झीम्बल ,मच्छिंद्र चौधरी, भिका संदानशिव ,जेसीबी चालक कमलेश पाटील ,तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

