
अमळनेर-पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त अमळनेर येथील सकल धनगर समाजातर्फे आज दिनांक 31 मे रोजी शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.

सदर शोभायात्रा आज दिनांक 31 रोजी दुपारी 4 वाजता चोपडा नाका येथून निघून रात्री 8 वाजता बस स्थानक चौकातील अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकावर पोहोचणार आहे.याठिकाणी माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील हे उपस्थितांना संबोधित करतील यानंतर अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण होऊन सामूहिक अभिवादन केले जाणार आहे.तरी सर्व धनगर व इतर समाज बांधवांनी यावेळी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन सकल धनगर समाज,अमळनेर तर्फे करण्यात आले आहे.





