
महाराणा प्रताप जयंतीनिमित्त झाले प्रेरणादायी व्याख्यान, विद्यार्थ्यांचा गुणगौरव
अमळनेर-अधिकारी होण्याचं मोठं धैर्य डोळ्यासमोर ठेऊन चारित्र्यही उत्तम ठेवा,शत्रू च्या स्रियांनी देखील महाराणांनी सन्मान केला.प्रभू श्रीराम असतील,छत्रपती शिवराय असतील, स्वामी विवेकानंद असतील किंवा महाराणा प्रताप असतील या सर्वांनी स्त्री मध्ये बाई नाही तर आईच पाहिली हेच या महापुरुषांचे वैशिट्य असल्याची भावना प्रसिद्ध व्याख्याते प्रा सचिन देवरे यांनी व्याख्यानातून व्यक्त केली.

हिंदू सूर्य वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त अमळनेरात दिनांक 29 मे रोजी अमळनेर तालुका राजपूत एकता मंचतर्फे जी एस हायस्कूल येथील आय एम ए हॉल मध्ये विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डी डी पाटील होते.यावेळी माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांचा राजपुत समाजाच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला.तर 10 वि आणि 12 वि तील गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.

सुरवातीला पाहुण्यांचा परिचय मंगलसिंग पाटील व विजयसिंग पवार यांनी केला.महाराणा प्रतिमेचे पूजन होऊन व्याख्याते प्रा.सचिन देवरे यांच्या व्याख्यानास प्रारंभ झाला.
पुढे बोलताना प्रा देवरे म्हणाले की मेवाड चा इतिहास मोठा असून जगातला हा एकमेव मोठा वंश आहे ज्याने सर्वात जास्त काळ राज्य केलं.याच भूमीवर 36 हजार युवतींनी अब्रू रक्षणासाठी एकाच वेळी जोहर केल्याचा इतिहास आहे.राणा प्रताप 66 वर्ष जगले,खरतर जी माणस चांगली होती त्यांना अल्पच आयुष्य लाभलं आहे.आजच्या पिढीने शिवचरित्र आणि राणा चरित्र जरूर वाचले पाहिजे,राणा प्रतापाना सत्तेची लालसा नव्हती त्यांचा लढा परकीयांशी होता,स्वप्न आणि धैर्यासाठी ते वेडेपिसे झाले होते,आजचे तरुण मोबाईल आणि बाईलवेडे झाले आहेत.हिंदू सूर्य ही पदवी केवळ महाराणांना मिळाली,कारण ते दानी होते,कोणतीही अपेक्षा ते करीत नव्हते,सर्वच समाजावर त्यांनी प्रेम केले तसेच तुम्हीही समाजासाठी काम करताना कोणतीही अपेक्षा बाळगू नका असे आवाहन करत राणांच्या दिवेर युद्धावर त्यांनी प्रकाशझोत टाकून राणा प्रताप म्हणजेच प्रभू श्रीरामांचे 163 वे वंशज असल्याचा खुलासा त्यांनी केला. व्यसनमुक्तीचा संदेश देखील त्यांनी शेवटी दिला.एकंदरीत राणा प्रतापांचा पराक्रम,स्वाभिमान,आणि देशभक्तीवर अभ्यासपूर्ण असे हे व्याख्यान झाले.
सालाबादप्रमाणे महाराणा प्रताप जयंतीला धांगडधिंगा न करता विद्यार्थी गुणगौरव व व्याख्यानाचे आयोजन केल्याने सर्वानी कौतुक केले.कार्यक्रमास ऍड व्ही आर पाटील,चंदूसिंह परदेशी,विक्रांत पाटील यासह शहर व ग्रामिण भागातील समाजबांधव व महिला भगिनी उपस्थित होते.सूत्रसंचालन सौ वसुंधरा लांडगे तर आभार अनिल पाटील यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजपूत एकता मंच अमळनेर तालुका व शहर तसेच महाराणा प्रताप जयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
स्मारक स्थळी अनेकांचे अभिवादन
महाराणा प्रताप चौकातील स्मारक स्थळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील,पालकमंत्री गुलाबराव पाटील,आमदार अनिल पाटील,जिल्हा बँक अध्यक्ष संजय पवार तसेच प्रांताधिकारी नितीन मुंडावरे,मुख्याधिकारी तुषार नेरकर, बीडीओ नरेंद्रसिंग राजपूत यासह दिवसभरात असंख्य मान्यवरांनी भेट देउन महाराणा प्रतापांच्या प्रतिमेस अभिवादन केले.




