
प्रांताधिकारी नितीन मुंडावरे यांना साऊ एकल महिला समितीतर्फे निवेदन सादर…
अमळनेर:- पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे हे ३०० वे जयंती वर्षात एकल महिलांचे सर्वेक्षण करून एकल महिलांच्या पुनर्वसनासाठी राज्याने स्वतंत्र धोरण जाहिर करावे या मागणीचे निवेदन अमळनेर प्रांताधिकारी नितीन मुंडावरे यांना साऊ एकल महिला समितीतर्फे सामाजिक कार्यकर्ते यांचे माध्यमातून देण्यात आले.

अहिल्याबाई होळकर यांचे हे ३०० वे जयंती वर्ष आहे. अहिल्याबाई या एकल महिला राज्यकर्त्या असूनही त्यांनी जे कर्तुत्व दाखवले ते राज्यातील सर्व एकल महिलांसाठी अत्यंत प्रेरक आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मृतीनिमित्त सदर सर्वेक्षण करून एकल महिलांचे पुनर्वसनाचे धोरण जाहीर व्हायला हवे अशी मागणी राजरथ फाउंडेशन चे अध्यक्ष सुनिल पाटील, निंभोरा ग्रामपंचायतच्या सरपंच पायल पाटील, अमळनेर अर्बन बँकेच्या संचालिका सौ.वसुंधरा लांडगे,स्नेहा पाटील, अमळनेर अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन रणजित शिंदे, सरपंच तारकेश्वर गांगुर्डे यांनी प्रांताधिकारी यांचे कडे केली आहे.

महाराष्ट्रात २०११ च्या जनगणनेत विधावा महिलांची संख्या ५४ लाख होती.अहिल्यानगर जिल्ह्यात एकल महिलांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात या एकल महिलांची संख्या फक्त ग्रामपंचायत क्षेत्रात एक लाख आहे. यावरून ऐकल महिलांची संख्या बरीच मोठी आहे.प्रत्येक जिल्ह्यात सदर महिलांची संख्या मोजली गेली तर या महिलांसाठी विविध योजनांची आखणी व अंमलबजावणी शासनाला करता येईल.असे यावेळी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी झालेल्या चर्चेत सदर सर्वेक्षण बिन खर्चिक आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीच्या ग्रामवकिास अधकिारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील एकल महालाची अंगणवाडी सेवका, आशा सेविका, बचत गट यांच्या मदतीने सदर सर्वेक्षण केल्यास सदरची संख्या तालुका जिल्हा स्तरावर मिळू शकेल अशी विनंती प्रांताधिकारी नितीन मुंडावरे, तहसीलदार रुपेश सुराणा यांना साऊ एकल महिला समितीच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते यांनी पुढाकार घेऊन केली आहे.




