अमळनेर :- अमळनेर शहरातील अखिल महाराष्ट्र मुस्लिम खाटीक जमातीच्या वतीने ५ फेब्रुवारी रोजी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून त्या संदर्भात सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शहरातील तसेच ग्रामीण भागातील समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते. उपस्थित समाजबांधवांनी विवाह सोहळ्यासाठी लागणारी आर्थिक मदत देखील जमा केली.यावेळी अमळनेर चे अध्यक्ष मुक्तार खाटीक,इम्रान खाटीक,अनिस खाटीक,जाकीर खाटीक,आरिफ खाटीक,नूरजमाल खाटीक,अजीज खाटीक,अब्बास खाटीक,सुपडू हाजी,हाजी इसा खाटीक,हाजी हमीद जनाब,जावेद सर,सत्तार हाजी,जिना शेठ आदींसह असंख्य समाज बांधव उपस्थित होते.




