
अमळनेर-तालुक्यातील खापरखेडा प्र.डा.येथे एका 45 वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल दिनांक 17 रोजी घडली.

सुरेश देवाजी भिल असे मयत इसमाचे नाव असून त्याने आपल्या गावी राहत्या घरी घराच्या छताला गळफास घेतला.सदर घटना लागलीच निदर्शनास आल्याने त्यास बेशुद्ध अवस्थेत खाजगी वाहनात टाकून अमळनेर ग्रामिण रुग्णालयात आणण्यात आले.येथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.मयताच्या पश्यात पत्नी,एक मुलगा असा परिवार आहे.याबाबत अनिल सोनवणे यांनी मारवड पोलिसात दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोहेकॉ सुनील पाटील हे करीत आहेत.




