
अमळनेर: तालुक्यातील पिंपळे येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत शेतकऱ्यांना मुग पिकाचे दहा हेक्टरसाठी बियाणे वाटप करण्यात आले. यावेळी गावातील ग्रुप ग्रामपंचायत प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच सौ वर्षा युवराज पाटील ,सदस्य व निंबा बापू चौधरी , भाऊसाहेब पाटील, सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील ,महिलावर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

कार्यक्रमात शेती शाळा अंतर्गत शेतकरी निवड, बीजप्रक्रिया, माती नमुने काढणे, खत व्यवस्थापन याविषयी सहाय्यक कृषि अधिकारी पूनम पाटील यांनी मार्गदर्शन केले. सदरचा प्रकल्प राबवण्यासाठी मंडळ कृषी अधिकारी आर.एन. सोनवणे व कृषी अधिकारी प्रफुल पाटील यांचे सहकार्य लाभले. तसेच तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रकांत साठे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व बियाण्यांवर करावयाची आवश्यक बीज प्रक्रियावर मार्गदर्शन केले.
यावेळी उपस्थित असलेल्या 25 शेतकऱ्यांना मुगाची बियाणे देण्यात आले प्रति शेतकरी 0.40 गुंठासाठी बियाणे देण्यात आले शेती वरती पेरणी पूर्ण होईल तसेच पिकांच्या योग्य वाढीसाठी खतांची माहिती देऊन निगा राखण्याचा सल्ला दिला

