
माजी आमदार डॉ.बी. एस.पाटील यांनी विद्यमान खासदार व आमदारांना विचारला सवाल…
अमळनेर – सध्या विद्यमान खासदार व आमदार वरील विषयावर अनेक ठिकाणी सत्कार समारंभ स्वीकारताना दिसतात. परंतु ह्या विषयी ते स्पष्टपणे बोलताना दिसत नाहीत. पी.आय.बी.च्या बैठकीतील ठराव काय झाला. याची माहिती देत नाहीत.859 कोटी रुपये कुठून मिळणार ?केव्हा मिळणार? कसे मिळणार? ह्याची वाच्यता नाही. पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत समावेश झाल्याचा आदेश झाला आहे काय? ह्या गोष्टींची स्पष्टता केल्याशिवाय स्वतःची पाठ थोपटून घेण्याचे फलक लावणे हा जनतेला मूर्ख समजण्याचा प्रकार आहे. ह्या सर्व गोष्टींचा खुलासा व्हाव अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) चे नेते डॉ बी एस पाटील यांनी केली आहे.


