
अमळनेर:- येथे ७५ व्या स्मृती दिनानिमित्त ११ विद्यार्थ्यांनी बाल साने गुरुजी कलाकाराची मुलाखत घेतली. साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान येथे सुजय डहाके दिग्दर्शित श्यामची आई या सिनेमात श्याम (साने गुरुजी)ची
(शर्व गाडगीळ, पुणे )भूमिका करणाऱ्या कलाकाराची समूह मुलाखत अमळनेर येथील अद्विक भुषण सोनवणे, शिव रणजित शिंदे, मानवी सुनील पाटील, मुक्ता गौरव महाले
मानसी रमाकांत सैंदाणे, दक्षता उमेश काटे, कल्याणी संदीप पाटील, गार्गी सुनील जोशी, वेदांत रविंद्र देवरे, मानसी अनुराधा किशोर आदींनी बालकलाकाराची यांनी मुलाखत घेतली.

या मुलाखतीत तूला जेवायला काय आवडते. कोणते खेळ आवडतात, तू पुस्तक वाचतो का? तूला आई रागवते का? तू शिक्षक होशील का ? पासून साने गुरुजी विषयक माहिती असे भरपूर अनेक प्रश्न विचारले. पालकांनी देखील प्रश्न विचारले. त्यावेळी साने गुरुजी जीवनगाथा या परीक्षेत परीक्षण लिहलेले नारायण पवार देखील उपस्थित होते.
डाॅ विकास हरताळकर यांच्या स्वामी विवेकानंद शाळेतील मुलेमुली देखील चोपडा येथून या कार्यक्रम पाहण्यासाठी आले होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गौरव महाले, संजय बारी, शुभम पवार प्रथमेश कोठावदे, प्रणव पाटील, आश्विनी वाघमोडे, शिव निकम, अभय वाघमोडे,खुशाल भामरे, देवेंद्र पाटील, मंदाकिनी पाटील यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दर्शना पवार यांनी केले. मुलांचे व पाहुण्यांचे स्वागत मिलींद वैद्य, चेतन सोनार, गोपाळ नेवे यांनी केले. या विशेष कार्यक्रमाच्या वेळी श्याम म्हणजे शर्व गाडगीळच्या आई ऋचा मुळे देखील उपस्थित होत्या.अमळनेर परीसरातील सर्व पालक शाळा शिक्षक आदींचे स्वागत व आभार मानले.

