
अमळनेर: तालुक्यातील खवशी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी सुर्यकांत बळीराम कापडे व व्हाईस चेअरमन पदी सुमनबाई मधुकर पवार यांची एक मताने बिनविरोध निवड करण्यात आली.

सदर निवडी प्रसंगी जेष्ठ संचालक शामकांत देशमुख, गजानन सुर्यवंशी, संजय कापडे चंद्रकांत सुर्यवंशी,उषाताई कापडे ,नरेंद्र सुर्यवंशी,विश्वास सूर्यवंशी ,आंनदा गोसावी,
महेद्र गोसावी ,कैलास पाटील तसेच मा सरपंच अरूण देशमुख, मा उपसरपंच गणेश बावीस्कर, सरपंच प्रतिनिधी अरून गोसावी,उपसरपंच धनराज पवार,मा सरपंच लोटण भाऊसाहेब, एकनाथ आबा ,अर्जुन कापडे,सुनिल सुर्यवंशी,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राहुल मराठे ,जगतराव पवार, शशीकांत कापडे आबा टेलर्स व ग्रामस्थ हजर होते. निवडणूक अधिकारी म्हणून एस पी महाजन, व सचिव भरत पाटील यांनी काम पाहीले.




