
अमळनेर – दि. 21 येथील लोकमान्य शिक्षण मंडळाच्या प्रांगणात योग दिन उत्साहात साजरा झाला. लोकमान्य विद्यालय, नवीन मराठी शाळा व बाल विकास मंदिराचे विद्यार्थी, शिक्षक व पालक ह्या योग शिबिरात सहभागी झाले होते.

प्रसिद्ध योग शिक्षक धर्मसिंह धनसिंह पाटील सर यावेळी मार्गदर्शक म्हणून लाभले. यावेळी त्यांनी विविध योग प्रकार व प्राणायाम उपस्थितांकडून करवून घेतले. दैनंदिन जीवनातील योगाचे महत्व सांगत विविध योगासने करत असताना त्यांचे शारीरिक, मानसिक लाभही त्यांनी सांगितले. यावेळी शाळेचे शिक्षक किशोर बडगुजर यांनीही योगासनांची प्रात्यक्षिके करवून घेतली. लोकमान्य विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोहर महाजन व नवीन मराठी शाळेचे मुख्याध्यापक अतुल भोई यांनी योगशिक्षक डी. डी. पाटील सर यांचा सत्कार केला. शिक्षक मकरंद निळे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.




