
अमळनेर:- अमळनेर येथे कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी जाते असे सांगून घरातून निघालेली शहापूर येथील तरुणी हरवल्याची झाल्याची तक्रार तिच्या भावाने केली आहे.

शहापूर येथील १९ वर्षीय तरुणी सकाळी ११ वाजता अमळनेर येथे प्रताप कॉलेज मध्ये ऍडमिशन घेऊन येथे असे सांगून लहान बहिणीला सोबत घेऊन निघाली. त्यानंतर मी संध्याकाळी पाचच्या गाडीने येते असे सांगून लहान बहिणीला तिने दुपारी तीन वाजेच्या बसने पाठवून दिले. मात्र सायंकाळच्या बसने देखील ती परत न आल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला मात्र एक दिवस उलटून ही तपास न लागल्याने मुलीच्या भावाने मारवड पोलिसांत हरवल्याची तक्रार दाखल केली असून पुढील तपास हेकॉ मुकेश साळुंखे हे करीत आहेत.




