
अमळनेर:- तालुक्यातील लोण सिम येथे घराच्या अंगणात लावलेली दुचाकी रात्रीतून चोरून नेल्याची घटना २७ रोजी सकाळी उघडकीस आली आहे.

फिर्यादी जयेश विजय पाटील (वय २६) रा. लोण सिम याने २६ रोजी रात्री ११:३० वाजता त्याची ६० हजार रुपये किमतीची बजाज पल्सर दुचाकी (क्रमांक एमएच ५४ ए ६९४४) ही घराच्या लावून झोपी गेला. २७ रोजी सकाळी उठून पाहिले असता दुचाकी जागेवर दिसून आली नाही. त्यानी आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला मात्र दुचाकीचा कोणताच तपास न लागल्याने अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची खात्री झाली. त्यामुळे त्याने मारवड पोलिसांत तक्रार दाखल केली असून पुढील तपास हेकॉ दिनेश पाटील हे करीत आहेत.




