
अमळनेर:- शहरातील फरशी पुलावर मालवाहू ट्रक ने पुढे चालणाऱ्या मोटारसायकल ला जोरात धडक दिल्याने मोटारसायकल स्वार गंभीर जखमी झाला असून ट्रक चालकाविरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाळधी ता.धरणगाव येथील रहिवाशी असलेले सतीश भादू नन्नवरे व सागर किशोर खांडेकर हे १३ जून रोजी एम एच १९ सी डब्लू ३३२१ नंबरच्या ज्युपीटर कंपनीच्या मोटारसायकलने धार ता. अमळनेर येथे सेंट्रिंग कामासाठी जात होते. धार येथे जातांना शहरातील फरशी पुलावर त्यांच्या मागून येणाऱ्या मालट्रक एम एच २० डी इ २३८७ वरील चालकाने त्यांच्या मोटारसायकल ला जोरात मागून धडक दिली.यात सतीश नन्नवरे यांच्या पायाला जबर दुखापत झाल्याने त्यांना जळगाव येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले.
सतीश नन्नवरे यांच्या पत्नीच्या फिर्यादीवरून अज्ञात मालट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ गणेश पाटील करत आहेत




