
अमळनेर :- शेतीच्या वादातून एकाला त्याच्या सख्या भावाने आणि पुतण्याने जबर मारहाण केल्याची घटना उघडकीस आली असून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील पैलाड भागातील सुरेश गोरख पाटील हे ४ भाऊ असून त्यांची अमळनेर शिवारात गट न. ७८९ मध्ये वडिलोपार्जित २ एकर ७२ आर शेती आहे.मात्र त्यांचा मोठा भाऊ राजेंद्र गोरख पाटील यांनी वडिलांची परस्पर सही घेऊन ही जमीन स्वतःच्या नावावर केल्याची तक्रार सुरेश पाटील यांनी केली असून याची न्यायालयीन चौकशी सुरू आहे.
२१ रोजी सुरेश पाटील हे त्यांच्या पत्नीसोबत शेतात गेले असता त्यांचा भाऊ राजेंद्र पाटील,पुतण्या गोरख पाटील तसेच दीपक शिवराम पाटील यांनी राजेंद्र पाटील यांना लाकडी दांडक्याने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.सुरेश पाटील यांच्या पत्नीने भांडण आवरले.सुरेश पाटील यांना जास्त लागल्याने त्यांना धुळे येथील रुग्णालयात पाठविण्यात आले होते.
सुरेश पाटील यांना मारहाण केल्याप्रकरणी वरील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ. गणेश पाटील करत आहेत.




