
अमळनेर– छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण या योजनेंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर ” वावडे मंडळ भागातील पिंपळे येथे पार पडले.

सदर शिबिरात वावडे,तरवाडे, लोण बु, लोण खु, लोणचारम, लोण सिम, जवखेडा, मांडळ, शिरसाळे बु, शिरसाळे खु, झाडी, ढेकू चारम, आर्डी, खडके, आनोरे, पिंपळे बु, चिमणपूरी, पिंपळे खु, अटाळे या गावातील नागरिकांनी लाभ घेतला.या शिबीराचे उदघाटन माजी जि प सदस्या सौ जयश्री अनिल यांचे हस्ते करण्यात आले.
सदर शिबीरात उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे,तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, पिंपळे सरपंच वर्षा युवराज पाटील, गटविकास अधिकारी नरेंद्र पाटील,महिला व बालकल्याण अधिकारी प्रेमलता पाटील, निवडणुक नायब तहसिलदार प्रशांत धमके, संजय गांधी योजना नायब तहसिलदार राजेंद्र ढोले व तालुका स्तरावरील सर्व कार्यालये यांचे अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.प्रत्येक विभागाने स्वतः उपस्थित राहून आपआपल्या विभागाचे स्टॉल लावून मंडळ भागातील सर्व गावातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, विदयार्थी व महिला यांचे शासकीय विभागांशी संबंधित तक्रारींचे/समस्यांचे निराकरण करुन वंचित लाभार्थीना सौ जयश्री पाटील तसेच नितीनकुमार मुंडावरे यांचे हस्ते प्रमाणपत्र/धनादेशाचे वाटप करण्यात आले.
शिबीरात तहसिल कार्यालय अमळनेर येथील पुरवठा शाखा, संगायो शाखा ,सेतु शाखा तहसिल कार्यालय अमळनेर तसेच पंचायत समिती व महिला बालविकास अमळनेर च्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ देण्यात आला.
या शिबिरात प्रथम लोकनियुक्त सरपंच महिला सौ वर्षा युवराज पाटील यांनी व्यासपीठ उपलब्ध करून दिले व परिषद परिसरातील लोकांना जनजागृती करण्यासाठी सहकार्य केले.ग्रुप ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील,पुरुषोत्तम चौधरी, माजी शेतकी संघ प्रेसिडेंट संजय पुनाजी पाटील, निंबा बापू चौधरी, अटाळेचे सरपंच सदा बापू पाटील, पिंपळे बुद्रुकचे माजी सरपंच योगेश अशोक पाटील, माजी सरपंच दिनेश पाटील, सदस्य संतोष चौधरी उपस्थित होते. ग्रामीण भागातील सर्व गावकरी परिसरातील मोठ्या संख्येने लोकांनी शिबिराचा लाभ घेतला व संजय निराधार श्रावण बाळ योजना सर्व माता-भगिनींना यांना अल्पोपहाराची व्यवस्था सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील यांनी केलेली होती
सदर शिबीरात अंदाजे 600 ते 650 लोकांनी उपस्थिती नोंदवून समाधान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.प्रास्तविक नितीनकुमार मुंडावरे यांनी तर शिक्षक संजय पाटील यांनी सुत्रसंचालन केले. आभार प्रशांत धमके यांनी मानले.




