
भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
अमळनेर- महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक 2024 मागे घेणे तथा रद्द होणे बाबत भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे अमळनेर उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

यात म्हटले आहे की महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक 2024 हे घटना विरोधी आणि लोकशाहीस बाधक विधेयक असून जनतेच्या मुलभूत हक्कांवर गदा आणणारे आहे . त्यामुळे हे विधेयक मागे घ्यावे रद्द करावे या मागणीसाठी राज्यभर व्यापक लढा उभारण्याचा निर्धार भाकप, माकप, माकप माले,शेकाप, सकप, समाजवादी पक्ष, भारत जोडो अभियान,श्रमिक मुक्ती दल,विविध डाव्या व लोकशाही पक्ष संघटनांनी केला आहे. या अंतर्गत 22 एप्रिल रोजी जनसुरक्षा विधेयकाविरोधात राज्यातील 78 ठिकाणी निषेध करण्यासाठी मोर्चे, निदर्शने, आंदोलन करण्यात आले आहेत. याचाच भाग म्हणून 30 जून मुंबई येथे सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आझाद मैदानावर विराट मोर्च्याचे आयोजन केले होते. त्या अनुषंगाने स्थानिक प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
वयोवृद्ध संजय गांधी निराधार, श्रावण बाळ आणि अन्य योजनेचे लाभार्थी यांची होत असलेली गैरसोय थांबवावी तसेच मानधन मिळण्यासाठी उपाययोजना करावी, शेतकर्यांना नैसर्गिक आपत्ती अनुदान व नुकसान भरपाई मिळावी,सरकारी कार्यालय भ्रष्टाचार मुक्त करावेत, शेतमजूरांना मनरेगा मार्फत काम मिळावेत,घरकुल योजनेतील अडचणींवर त्वरित मार्ग काढून घरकुल मंजूर व्हावेत आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
सदर निवेदन देताना जिल्हा सेक्रेटरी कोम्रेड ज्ञानेश्वर पाटील,तालुका सेक्रेटरी कॉम्रेड वाल्मिक मैराळै, कॉम्रेड प्रभुदास कसबे,कॉम्रेड निलाबाई भिल (सरपंच कुर्हे),
कॉम्रेड जगदिश संदानशिव, कॉम्रेड नारायण मैराळे, निर्मला उत्तम भिल, सुनंदा चैत्राम भिल,मठाबाई अंकुश भिल , विनायक धुडकू सोनवणे, दिनेश राजु पवार, दिपक विक्रम बिर्हाडे इ. कार्यकर्ते हजर होते.




