
अमळनेर: तालुक्यातील पातोंडा येथील पिक संरक्षण सहकारी संस्थेवर सहकार पॅनल ने एकहाती सत्ता मिळवत सर्व जागांवर विजय मिळवत वर्चस्व कायम राखले आहे.

सविस्तर पातोंडा पिक संस्थेची पंचवार्षिक निवडणूक २८ जून रोजी झाली.सर्व पॅनलच्या तेरा जागावर विजय मिळवला.पंचवीस वर्षानंतर प्रथमच निवडणूक झाल्यामुळे मतदारांमध्ये व उमेदवारांमध्ये मोठा उत्साह पहावयास मिळाला.एकूण ८९ टक्के मतदान झाले. विजयी उमेदवार असे एकनाथ सुकलाल लोहार (वि.जा.भ.ज.),सुनील भास्कर गव्हाणे( अनुसूची जाती जामाती), तर सर्व साधारण गटात सुनील गुलाबराव पवार, नेहरू रामदास पवार,राजेंद्र रंगराव पवार,संजय पांडुरंग बिरारी,मनोहर पंडित बोरसे,भीमराव दौलत पवार,प्रताप विठ्ठल महाजन नांद्री,सुरेश किसन लाड,हे विजयी झाले.तर अशोक प्रभाकर पवार (इतर मागास प्रवर्ग),शिलुबाई रवींद्र पवार व निशाबाई दौलत लाड (महिला राखीव) हे तीन उमेदवार बिनविरोध झाले होते. तर प्रतिस्पर्धी विरोधी पॅनलचे सर्व उमेदवार पराभूत झाले आहेत.सहकार पॅनल प्रमुख प्रवीण बिरारी व संदीपराव पवार हे होते.
पातोंडा पिक संस्थेची १९४७ साली स्थापना झाली असून अमळनेर तालुक्यातील ही एकमेव संस्था अ वर्गात आहे. संस्थेची स्वतःची दुमजली इमारत आहे. सन १९९३-९४ मध्ये निवडणूक झाली होती. १९९९ पासून बिनविरोध होत होती. २५ वर्षानंतर प्रथमच निवडणूक झाल्यामुळे मतदारांमध्ये व उमेदवारांमध्ये मोठा उत्साह पहावयास मिळाला. निवडणूक अधिकारी म्हणून एस पी महाजन, केंद्र अध्यक्ष कुलकर्णी, संस्थेचे सचिव हेमंत देशमुख आदींनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली. निवडणूक प्रक्रिया शांततेत व खेळीमेलीच्या वातावरणात पार पडली

