
अधिकारी चौकशी करून गेल्यानंतर संचालकांमध्ये हाणामाऱ्या
अमळनेर : येथील अल्फाईज उर्दू गर्ल्स शाळेत बोगस पदांबाबत दोन उपशिक्षणाधिकाऱ्यांनी चौकशी केली असून त्याचा अहवाल जिप मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येणार असल्याचे चौकशी अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान अधिकारी चौकशी करून गेल्यानन्तर संचालकांमध्ये हाणामाऱ्या झाल्याचे समजते.

शाळेचे सचिव शेख शरीफ शेख शेख इब्राहिम यांनी त्यांचा भाचा तथा मुख्याध्यापिका नसीम बानो शेख इब्राहिम यांचा मुलगा बेलदार हनिफ जमाल खान यांची बेकायदेशीर पणे प्रयोगशाळा सहाययक म्हणून तर जावई मिर्झा आदिल शेख अफसर बेग , याची शिपाई म्हणून , पुतण्या फरहान साजिद शेख नाजनीन शरीफ देशमुख यांची बेकायदेशीर भरती करून मान्यता तसेच शालार्थ आय डी देखील मिळवले. गेल्या तीन ते पाच वर्षांपासून शासनाकडून पगार लाटून लूटमार केली आहे अशी तक्रार बिस्मिल्ला शेख फत्तेखान , सलीम शेख मेहबूब , हसनअली अब्दुल रेहमान , तस्लिम कौसर मझहरखान , नाजीम शेख सलीम सैय्यद , खिलाफत अली मकदुम अली ,अब्दुल नासिर अब्दुल नबी शेख यांनी शिक्षणाधिकारीकडे केली होती. याबाबत शिक्षणाधिकारिनी मुख्याध्यापिकाना कागदपत्रे घेऊन दोनवेळा चौकशीसाठी बोलावले होते. मात्र चौकशीला कोणीही गेले नाही म्हणून उपशिक्षणाधिकारी फिरोज पठाण , रागिणी चव्हाण यांनी १ रोजी प्रत्यक्ष शाळेत येऊन चौकशी केली. मात्र चौकशीत काय कागदपत्रे दिली किंवा काय याबाबत अधिकाऱ्यांनी गोपनीयतेचे कारण देत नकार दिला. चौकशीचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्याना देण्यात येणार आहे असे सांगितले.
दरम्यान अधिकारी चौकशी करून गेल्यानंतर संचालकांच्या आपसात हाणामाऱ्या देखील झाल्या तक्रारदाराना मारहाण झाल्याबाबत ते तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये गेले होते.
तालुक्यात अनेक संस्थांमध्ये ही बोगस भरतीची अनेक प्रकरणे…
तालुक्यातील अनेक संस्थांमध्ये ही काही भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरत शालार्थ आयडी काढून बेकायदेशीर भरती केली आहे. परवानगी नसताना लाखो रुपये घेऊन शासनाचा प्रकार करण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. त्यामुळे या इतर संस्थांमध्येही चौकशी करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

