
अमळनेर(प्रतिनिधी):- तालुक्यातील अमळगाव येथे निंबाच्या झाडाखाली पत्ते खेळणाऱ्या ५ जणांवर मारवड पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

मारवड पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सपोनि जिभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पोउनी संजय पाटील, सफौ फिरोज बागवान, पोना मिलिंद बोरसे,पोकॉ.उज्वल पाटील यांनी अमळगाव येथे निंबाच्या झाडाखाली पत्ते खेळत असणाऱ्या लोकांवर धाड टाकली यात किसन पारधी,प्रवीण पारधी ,कैलास पाटील,संजय भोई, कैलास वडर सर्व रा . अमळगाव हे पत्ते खेळतांना सापडले त्यांच्या जवळील रोख ५ हजार ५०० रुपये जप्त करण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पो हे कॉ संजय पाटील करत आहेत.

