
अमळनेर:- नोटीस बजावून ही नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी कागदपत्रे सादर न केल्याने परेश उदेवाल याने निवेदन देत बेकायदेशीर भरती झाल्याचा आरोप करून साखळी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
अमळनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना याबाबत निवेदन देण्यात आले असून नोटीस बजावून ही अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी फायरमन कोर्सचे प्रमाणपत्र सादर केले नसल्याचे नमूद केले आहे. पुढील दहा दिवसात कोणतीही कारवाई न झाल्यास सात दिवसाचे साखळी आंदोलनाचा इशारा परेश उदेवाल याने दिला आहे.

