
अमळनेर : एकीकडे देश सक्षम होण्यासाठी पंतप्रधान स्वच्छ भारत अभियान राबवत असताना तालुक्यातील नांद्री येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना उकिरड्यातून जावे लागत आहे. ग्रामपंचायतींचे याकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार महेश लक्ष्मण नागेश यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.
नांद्री येथील जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराजवळ गेल्या अनेक वर्षापासून उकिरडा टाकलेला आहे. त्यामुळे लहान बालकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेक पालक यामुळे मुलांना शाळेत पाठवायला नकार देतात. याबाबत ग्रामपंचायतींचे सरपंच आणि ग्रामसेवक यांच्याकडे तक्रार करूनही ते दुर्लक्ष करतात. उकिरडे उचललेच जात नसल्याने शाळेच्या परिसरात घाणीचे साम्राज्य वाढले आहे. गटविकास अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन तात्काळ समस्या सोडवावी अशी मागणी महेंद्र नागेश यांनी केली आहे.

