
अमळनेर:- येथील चोपडा रस्त्यावरील गजानन महाराज मंदिराजवळ सुरू असलेल्या इमारतीच्या बांधकाम स्थळी शनिवारी सकाळी 11 वाजता विजेचा शॉक लागून 20 वर्षीय बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला आहे,
याबाबत अधिक माहिती अशी की, मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील सुधामपूर येथील रहिवासी विनायक नानू उईके (वय 20) हा शनिवारी सकाळी पाचव्या मजल्यावर काम करत असताना त्याला विजेचा शॉक लागला. त्यात त्याचा मृत्यू झाला. सेंट्रिंग ठेकेदार हिरालाल बाबुराव गांगुर्डे यांच्याकडे तो कामाला होता. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर इमारत मालकाचे नाव निष्पन्न न झाल्याने पोलिसानी त्यांचा शोध घेऊन गुन्हा दाखल करावा, अशी मागणी होत आहे. त्यानुसार इमारत मालकाचा शोध घेऊन गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. तर या घटनेचा पुढील तपास पीएसआय नामदेव बोरकर करीत आहेत.

