
अमळनेर (प्रतिनिधी) खावटीची रक्कम न भरल्याने एकास १० महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी येलमाने यांच्या न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, विलास दंगल मोरे (भिल) यांनी खावटीची रक्कम न भरल्याबाबत उज्वला विलास मोरे यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यांच्या वतीने ॲड. शकील अ. काझी यांनी काम पाहिले. दि. २१ जुलै २०२५ रोजी सुनावणी दरम्यान, आरोपी विलास मोरे यांना वॉरंटाद्वारे अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणी दरम्यान न्यायालयाने नोंद घेतली की, त्यांनी खावटीची रक्कम अद्याप भरलेली नाही. त्यामुळे, डिग्री क्र. २७ अन्वये आदेश पारित करत त्यांना १० महिन्यांसाठी तुरुंगवास ठोठावण्यात आला.




