
अमळनेर:- शहरातील विविध भागातील वीज रोहित्रातील धातूच्या पट्ट्या चोरणाऱ्या दोघांविरुद्ध अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सहाय्यक अभियंता हेमंत सैंदाणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक १ जून ते २५ जुलै २०२५ या तारखेदरम्यान शहरात वेळोवेळी वीजपुरवठा खंडित झाल्याने महावितरण कर्मचाऱ्यांनी पाहणी केली असता रोहित्रातील पेटीमधील कॉपर पट्ट्या चोरी झाल्यामुळे वीजपुरवठा वेळोवेळी खंडित झाल्याचे कारण निदर्शनास आले. त्यामुळे सहाय्यक अभियंता व कर्मचाऱ्यांनी शहरातील विविध ठिकाणचे सीसीटीव्ही चेक केले असता नगरपरिषदेचे पथदिवे दुरुस्त करणारे बाह्य स्रोत कर्मचारी तुषार पाटील व हर्षल पाटील (दोन्ही रा. मंगरुळ ता. अमळनेर) या दोघांनी ह्या पट्ट्या चोरी केल्याचे उघड झाले. त्यामुळे प्रत्येकी २५ ग्रॅम वजनाच्या ४५०० रु. किमतीच्या दीडशे कॉपर पट्ट्या चोरल्या प्रकरणी दोघांवर अमळनेर पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हेकॉ विनोद भोई हे करीत आहेत.




