
प्रतिनीधी | पाडळसरे :- खान्देशातील महत्वाचा मुख्य सण म्हणून ओळख असलेला ग्रामदैवत कानबाई मातेचा उत्सव पाडळसरे येथे मोठ्या हर्षोल्हासात साजरा करण्यात आला, शनिवार ते सोमवार सलग तीन दिवस गावात कामानिमित्त बाहेर गावी गेलेले गावागावातील भाऊबंदकितील लोक परिवारासह गावात दाखल झाले व गावात यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. या कानबाई उत्सवासाठी तीन दिवस महिला व नागरिकांकडून लगबग व जोडपीच्या जोडपी कानबाई पुजनासाठी रांगा लावून दर्शन घेत निघत होत्या.
गावातील राजेंद्र पाटील व विजय गुर्जर यांच्या घरी यावर्षी कानबाईची स्थापना करण्याचा मान भाऊबंद कडून प्राप्त झाल्यावर शनिवारी कानबाईची भजन व गायनाचा कार्यक्रम स्थापना झाल्यावर काल रात्रभर जागरचे भजन संत तुकाराम महाराज भजनी मंडळाने सादर केले, सायंकाळी कानबाई जवळ प्रत्येक भाऊबंदकितील महिला व पुरुषांनी रोट चे पूजन करून गाऊन संगीत तालावर नाचगाने करून नतमस्तक होत जागरण केले. व आज दिनांक 28 रोजी श्रावनातील पहिल्याच सोमवारी सकाळीच 7 वाजे पासुन कानबाई विसर्जन तयारीची लगबग दिसत होती महिला व मुलींनी आपापला खान्देशी पारंपारिक वेषात कानबाईचे जोडप्यांनी पुजन करून प्रसाद वाहुन पारंपरिक सवाद्य विसर्जन मिरवणूकीस सुरूवात केली. गावातील घराघरातून सुवासिनींनी कानबाईचे पुजन करण्यात केले चौका चौकात भजनी मंडळ, डफ व ढोल ताश्याचा गजरात गावकरी कानबाईची गाण्यावर व संगीताच्या तालावर बेभान होऊन नाचत होते. पुनर्वसन गावातील मिरवणूक जाण्यास हनुमान मंदिर, मरिआई पासून जुन्या पाडळसरे गावात गेल्यावर ग्राम दैवत अंबिका मातेच्या मंदिरात गावातील सर्व कानबाईचे एकत्रीत सामुहिक पुजन व आरती होऊन पुन्हा जुन्या गावभर मिरवणूक तापी नदी काठावरील नाटेश्वर महादेवा समोर कानबाईला विश्रांती देऊन तापी बोरी अनेर नदीच्या त्रिवेणी संगमवरील तीरावर उपस्थित सर्व गावकर्यांनी आरती करून तापी नदीच्या संगम पाण्याच्या प्रवाहात कानबाई मातेला तापी तीर्थ दाखवून मोठ्या मनाने “कानबाई माता कि जय” म्हणत विसर्जन करण्यात आले. यावेळेस महिला वर्ग भावविवश झालेल्या दिसल्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गावातील गुर्जर, कोळी, कुणबी पाटील व आदिवासी बांधवानी सलग तीन दिवस सर्व शेतीकामे व रोजंदारी बंद ठेवून सक्रिय सहभागी होत परिश्रम घेतले




