
सकल धनगर समाजाचे प्रांताधिकारी यांना निवेदन…
अमळनेर(प्रतिनिधी)- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विषयी सुनील गोपाळराव उभे या व्यक्तीने समाजमाध्यमांवर अत्यंत अपमानास्पद शब्दप्रयोग करून देशातील समस्त धनगर समाजाच्या मनात चीड निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी सकल धनगर समाजाच्या वतीने प्रांताधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांना निवेदन देऊन करण्यात आली.
याप्रकरणी दुर्लक्ष झाल्यास सामाजिक जनक्षोभ वाढून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर प्रकरणी तात्काळ दखल घेऊन अपप्रवृत्तीवर कठोर शिक्षा करावी असे निवेदनात म्हटले आहे.यावेळी महाराष्ट्र प्रदेश मौर्यक्रांती संघाचे उपाध्यक्ष बन्सीलाल भागवत,राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या विमुक्त सेलचे तालुकाध्यक्ष एस.सी.तेले एस.सी.तेले, प्रा.अशोक पवार,प्रा.सुभाष पाटील,रियाज शेख,हरचंद लांडगे,गोपीचंद शिरसाट, प्रदीप कंखरे,रमेशदेव शिरसाट,दिलीप ठाकरे, मनोहर मोरे,अनिल धनगर,विकास सूर्यवंशी,सौरव भागवत,दिलीप खांडेकर,प्रा.आर.पी. धनगर,कैलास ठाकरे,जितेंद्र भालेराव,दिनेश धनगर,नामदेव ठाकरे, तुकाराम ठाकरे,परशुराम ठाकरे आदी उपस्थित होते.




