
अमळनेर:- अमळनेरात लपलेल्या पारोळा तालुक्यातून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला पारोळा पोलिसांनी जेरबंद केले आहे.
फिर्यादी ज्ञानेश्वर मच्छिंद्र कोळी रा. कोळपिंपरी यांची मालकीची 35,000/- हजार रुपये किमतीची हिरो कंपनीची मोटरसायकल 21 रोजी रात्री 11:00 वाजेनंतर कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्याचे घरासमोरून अंगणातून चोरून नेले बाबत पारोळा पोलीस स्टेशन येथे तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पो.ह सुनील हटकर हे करीत होते. सदरची मोटरसायकल गावातील अभय प्रवीण पाटील व त्याचा साथीदार यांनी चोरी केल्याची माहिती मिळाल्याने पो.ह सुनील हटकर, पो.ह प्रवीण पाटील,पो.अं अनिल राठोड यांचे पथक आरोपीच्या शोधार्थ रवाना झाले. यातील आरोपी अभय पाटील हा अमळनेर शहरात लपल्याची माहिती मिळाल्याने तांत्रिक विश्लेषण करून त्यांचा शोधून ताब्यात घेऊन गुन्ह्यातील मोटारसायकल बाबत विचाले असता त्याने त्यांचा साथीदार मयूर देवरे रा. मालेगाव याच्याकडे असल्याचे सांगितल्याने सदरचे तपास पथक हे मालेगाव येथे जाऊन आरोपी मयूर तुळशीदास देवरे रा. खडकी ता.मालेगाव जि. नाशिक यास ताब्यात घेऊन दोन्ही आरोपी यांना पोलीस स्टेशन येथे आणून विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.दोन्ही आरोपी याना गुन्ह्याकामी अटक केली असुन गुन्ह्यातील चोरीस गेला माल 35 हजार रुपये किमतीची हिरो कंपनीची मोटरसायकल क्रमांक एम एच 54 ए 2195 ही ताब्यात घेतली आहे. पोलीस निरीक्षक सचिन सानप पारोळा पोलीस स्टेशन,पो.ह सुनील हटकर,पो.ह प्रवीण पाटील,पो.ह महेश पाटील, पो.अंमलदार अनिल राठोड यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे.




