
अमळनेर:- येथील विद्या विहार कॉलनीतील विद्येश्वर महादेव मंदिराच्या वतीने दि.27 रविवार रोजी जळोद ते विद्येश्वर महादेव मंदिरापर्यंत पायी कावड यात्रा उत्साहात संपन्न झाली.
जळोद येथे अनिल साळूंखे, भैय्या साळूंखे यांच्या कडून जेवण्याची व्यवस्था तर कावड यात्रे दरम्यान जयंत पाटील, योगेश वाल्हे, विकी जाधव यांच्या कडून नाश्ता व चहाची व्यवस्था करण्यात आली होती. यात्रेत रवि पाटील सोबत संजय पाटील, अशोक साळूंखे, अमोल पाटील, सुनिल शिगांणे, प्रवीण गुजर, रोहित तेले, कल्पेश साळूंखे, नरेंद्र गुजर, मिलींद वारुळे, विवेक पाटील, सनी पाटील, सचिन सोनवणे, मोहित पवार, भागीरथ पाटील, अनिल शिगांणे, चेतन पाटील, यश अहिरे, प्रवीण वाघ, सुभाष चव्हाण, विलास सोनवणे, दिपक गुजर, सिद्धार्थ पाटील इ.सह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.




