
अमळनेर:- तालुक्यातील उपविभागीय अधिकारी नितिन कुमार मुडांवरे यांचे वाहन चालक ताराचंद महारू बाविस्कर यांना आज महसूल दिनाचे औचित्य साधत पालक मंत्री यांच्या हस्ते उत्कृष्ट वाहन चालक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
दि १ ऑगस्ट महसूल दिवस रोजी जिल्ह्यातील महसूल कर्मचारी यांना उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार प्रदान करण्यात आले त्यांन अमळनेर तालुक्यातील उपविभागीय अधिकारी यांचे वाहन चालक ताराचंद महारू बाविस्कर यांना देण्यात आला तर अमळनेर येथील नायब तहसीलदार प्रशांत धमके तसेच अमळनेर येथील उपविभागीय कार्यालय येथिल अव्वल कारकून अशोक ठाकरे, मंडळ अधिकारी संवर्गातून विठ्ठल पाटील तर कोतवाल संवर्गातून मुकेश शिसोदे यांना तसेच अमळनेर तालुक्यातील नगाव येथिल पोलिस पाटील प्रविण गोसावी यांना देखील उत्कृष्ट कर्मचारी म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आले असून सदर कार्यक्रम प्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरिश महाजन वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे जिल्हाधिकारी आयूष प्रसाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, आमदार राजूमामा भोळे, अमळनेर उपविभागिय अधिकारी नितिन कुमार मुडावरे तसेच तहसीलदार सुराणा व इतर कर्मचारी उपस्थित होते.

