
जळगाव डिस्ट्रीक्ट फर्टीलायझर, पैस्टीसाईडस व सिडस् डिल्स असोशिएशनने केला ठराव…
अमळनेर (प्रतिनिधी) किरकोळ कारणावरून अमळनेर येथे कृषी केंद्रावर कारवाई होत असल्याने जोपर्यंत रासायनिक खतांमधील युरिया खत 266 रुपये किमतीच्या खाली कृषी केंद्रांना मिळत नाही, तोपर्यंत नवीन खत खरेदी न करण्याचा निर्णय जळगाव डिस्ट्रीक्ट फर्टीलायझर, पैस्टीसाईडस व सिहस् डिल्स असोशिएशनच्या झालेल्या बैठकीत घेण्यात येऊन ठरावही करण्यात आला आहे. तो कृषी विकास अधिकारी यांनाही पाठवण्यात आला आहे. दरम्यान, या निर्णयामुळे शेतकऱ्यांची मोठी कोंडी होणार आहे.
जळगाव जिल्हा असोसिएशनची तातडीची बैठक घेऊन जिल्ह्यातील सर्व कृषी व्यावसायिकांना जोपर्यत युरिया खत २६६ च्या आत उपलब्ध होत नाही तोपर्यत युरिया खरेदी बंदचा ठराव घेण्यात आला. जोपर्यंत युरिया खताची आधारभुत किमतीपेक्षा कमी व कोणत्याही युरिया खत शासन निर्णयानुसार पोहोच स्वरूपात मिळणार नाही तो पर्यत कोणीही युरिया खत खरेदी करणार नाही. आता पर्यत आम्ही एक्स भाडे लावून आलेले खत विक्री करीत होते. तो युरिया आम्हाला एमआरपी पेक्षा जास्त भावात येत असल्याने आम्हालाही विक्री करीत असतांना शेतकरी बंधु तसेच शासन अधिकरी यांच्यारोषाला सामोरे जावे लागत आहे. तसेच जिल्हयात ग्रामीण भागात काही खोट्या तक्रारीवरून आमच्यावर मोठ्या प्रमाणावर निलंबनाच्या कारवाया झाल्या आणि अजून होत आहेत. त्यामुळे कृषी केंद्राच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचत आहे. तसेच फार मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. कालच्या बैठकित सर्व कृषी व्यावसायिकांनी युरिया खरेदी बंदचा ठराव घेण्यात आला असून फक्त कृषी केंद्रामधून शिल्लक यूरियाचीच विक्री केली जाईल. कोणत्याही प्रकारची युरीयाची खरेदी आम्ही करणार नाही. असा निर्णय घेतला आहे. यावेळी अध्यक्ष विनोद तराळ, उपाध्यक्ष प्रफुल्ल बांठीया, सचिव कैलास मालू, सहसचिव राजेंद्र पाटील, खजिनदार शैलेश काबरा अजूनच कृषी केंद्र चालक बैठकीला उपस्थित होते.




