
रुग्णांच्या घरी भेट देऊन कंटेनर सर्वेक्षणाची केली फेर पडताळणी
अमळनेर-शहरात डेंग्यूचे रुग्ण आढळल्यानंतर याबाबत वृत्त पत्रामध्ये वृत्त झळकताच जिल्हा हिवताप अधिकारी अमळनेरात दाखल होऊन त्यांनी रुग्णांच्या घरी भेट देऊन कंटेनर सर्वेक्षणाची फेर पडताळणी केली.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सचिन भायेकर यांच्या आदेशान्वये जिल्हा हिवताप अधिकारी डॉ प्रमोद सोनवणे,मुख्याधिकारी तुषार नेरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ गिरीश गोसावी,न प चे मुख्य वैदयकिय अधिकारी डॉ विलास महाजन, वैदयकिय अधिकारी डॉ संजय रनाळकर,आरोग्य निरीक्षक डॉ रमेश धनराळे यांनी अमळनेर शहरांतील शहरातील रुग्णांचे घरी प्रत्यक्ष भेट देवून पहाणी करुन प्रत्यक्ष कंटेनर सर्वेक्षणाची फेर पडताळणी करुन सदरील भागातील कामकाजाचा आढावा घेतला.व मार्गदर्शनही केले. सदरील प्रभागात किटक नाशक धूर फवारणी करण्यात आली तसेच डेंग्यु व हिवताप होवु नयें म्हणून डासाचे जिवन चक्र खंडीत करणेसाठी नाविन्य पुर्ण योजना म्हणुन पाण्याचे हंगामी व कायम स्वरुपी डबक्यामधे ऑईल बॉल (चेंडु) सोडण्यात आले. व पुढील आठवडयात वन टाईम अॅक्टीव्हीटी राबविण्या बाबत वैदयकिय अधिकारी व आरोग्य निरीक्षक यांची सभा घेवुन मार्गदर्शन करण्यात आले. नागरीकाना कोरडा दिवस पाळणे, पाण्याच्या टाक्या झाकुन ठेवणे, परीसर स्वच्छता राखणे, उघडयावरील टायर, मटकयांची विल्हेवाट लावणे बाबत प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले.
सदरील प्रभागात प्रशांत फुगे आरोग्य पर्यवेक्षक व आरोग्य निरीक्षक किशोर माळी यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हास माकडे, विजय दासतुंर, श्रीमती सरला महाजन, सरीता परदेशी श्रीमती गढरी, श्रीमती मंदा चौधरी, जयश्री बारी यांची चार पथके सर्वेक्षण करीत आहेत. नागरीकांच्या घरातील भांडे, फ्रिज, टायर, खुल्या जागेतील नारळाच्या करवंट्या तुटलेले प्लास्टीक भांडे यातील डेंग्यु डास अळया नष्ठ केल्या जात आहेत. उघडया विहरी मधे गप्पी मासे सोड्यात येत आहे. व अॅबेटींग करण्यात येत आहे.




