
अमळनेर : पाण्याच्या टाकीवर मांजात अडकलेल्या कावळ्याची सुटका करून अमळनेर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी कावळ्याला जीवदान दिले आहे.
११ ऑगस्ट रोजी सकाळी पावणे अकरा वाजता लालबाग टाकी जवळील निंबाच्या झाडावर लटकलेल्या मांजाच्या दोरात कावळा अडकल्याची माहिती पक्षी मित्र योगेश मोरे यांनी मुख्याधिकारी तुषार नेरकर याना कळवले. त्यांनी अग्निशमन दल प्रमुख गणेश गोसावी ,दिनेश बिऱ्हाडे , फारुख शेख , जफर खान , पठाण , आबीद शेख , भिका संदानशिव याना कावळ्याची सुटका करण्यास पाठवले. कर्मचाऱ्यांनी कावळ्याला बाहेर काढून त्याला निसर्गाच्या सानिध्यात सोडले.




