
अमळनेर : ढेकू रोडवरील मुक्ताई वाडीतील रस्त्यातील अतिक्रमण हटवण्यात यावे या मागणीसाठी महिलांच्या शिष्टमंडळाने उपमुख्याधिकारी रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन निवेदन दिले.
शहरातील ढेकू रस्त्यावरील मुक्ताई वाडी येथील गट नंबर १७४९ मध्ये रस्ता ९ मीटरचा असताना काही सामान्य नागरिकांनी अतिक्रमण केल्याने नागरिकांना त्रास होतो. शाळकरी मुले , वृद्ध , महिला याना सुरक्षित चालता येत नाही. अपघाताची शक्यता आहे त्यामुळे नगरपालिकेने अतिक्रमण काढून घ्यावे अशी मागणी महिलांनी केली. यापूर्वी २०२२ पासून निवेदने देऊन वारंवार मागणी करूनही पालिकेने दुर्लक्ष केले असून अतिक्रमण धारकांना संरक्षण क्सिले जात आहे. निवेदनावर सूचिता पाटील ,शशी पाटील , मनीषा पाटील , प्रतिभा पाटील , वंदना पाटील , सुषमा पाटील , सरला पाटील , पुष्पा पाटील, मीरा पाटील , सुनीता पाटील यांच्या सह्या आहेत.

