
अमळनेर : येथील वीर सावरकर मार्केटमधील सूर्या बॅटरीच्या शेजारी असलेल्या गोल्डन ऑटो गॅरेजला १३ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२ वाजता अचानक शॉर्ट सर्किट मुळे आग लागली. या आगीत गॅरेज मालक मुन्ना पठाण यांचे अंदाजे ७० हजार रुपयांचे स्पेअर पार्ट, दोन मोटर सायकल पल्सर, एक्टिवा जळून खाक झाले.
विशेष म्हणजे, आग लागली त्याच वेळी ऑटो गॅरेज मॅकेनिक संघटनेची बैठक याच परिसरात सुरू होती. घटनेची माहिती मिळताच सर्व सहकारी तात्काळ घटनास्थळी धावले आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, अग्निशमन दलाचा बंब वेळेत पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला. अग्निशमन दलाचे प्रमुख गणेश गोसावी यांच्यासह जफर पठाण , भिकन पठाण , आनंदा झिम्बाल , मच्छीन्द्र चौधरी , आकाश संदानशीव यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.





