
अध्यक्ष जितेंद्र झाबक यांचे संस्थेच्या चिटणीसांना पत्र,18 ऑगस्टला निवडणूक घोषित करणार
अमळनेर-येथील खान्देश शिक्षण मंडळाच्या विद्यमान कार्यकारी मंडळाची मुदत फेब्रुवारी 2025 मध्ये संपली असल्याने निवडणूक कार्यक्रम तातडीने तयार करा,आपल्याला 18 ऑगस्ट 2025 रोजी निवडणूक कार्यक्रम घोषित करावयाचा असल्याचे आदेश संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र झाबक यांनी दिनांक 14 ऑगस्ट रोजी लेखी पत्रांन्वये संस्थेच्या चिटणीसांना दिले आहे.
सदर पत्रात अध्यक्ष श्री झाबक यांनी म्हटले आहे की खा. शि. मंडळाची मागील निवडणूक ही नव्या घटनेप्रमाणे झाली होती.परंतु ही निवडणूक मा. धर्मदाय उप आयुक्त जळगाव यांच्या मान्यतेनंतर घ्यायची होती. परंतु आपण त्यांची परवानगी न घेता ही निवडणूक घोषीत केली होती.मा. धर्मदाय उप आयुक्त जळगाव यांनी नवीन घटना ही नामंजूर केली होती. तसेच या बेकायदेशीर निवडणूकीत माझी निवड व ट्रस्टी यांची निवड ही जून्या घटनेप्रमाणेच आहे व उर्वरीत निवडणूक ही बेकायदेशीर घटनेप्रमाणे घेतली असल्यामुळे मा. धर्मदाय उप आयुक्त जळगाव यांनी फेरफार अर्ज क्र. २५१/२२ हा नामंजूर केला आहे. त्यामुळे या संचालक मंडळाने घेतलेले सर्व धोरणात्मक निर्णय हे देखील बेकायदेशीर झालेले आहेत.
तरी आता मी आपणास आदेशीत करू इच्छितो की आपल्या घटनेप्रमाणे पूर्ण मंडळाची मुदत ही फेब्रुवारी २०२५ मध्ये संपलेली असल्यामुळे नवीन निवडणूक घेणे हे घटनेप्रमाणे घेणे मला बंधनकारक आहे. तरी आपण दि. १८ ऑगस्ट २०२५ रोजी दु. १२ वाजेपर्यंत पूर्ण निवडणूक कार्यक्रम तयार करावा व मतदार यादी तयार ठेवावी जेणेकरून आपल्याला उद्या दि. १८ ऑगस्ट २०२५ रोजी निवडणूक कार्यक्रम घोषीत करावयाचा आहे.तरी मला दि. १८ ऑगस्ट २०२५ रोजी दु. १२ वाजेपर्यंत कार्यक्रम तयार करून द्यावा जेणेकरून आपणास घटनेनूसार निवडणूक घोषीत करता येईल असे या पत्रात म्हटले आहे.
निवडणूक घोषित करणारच
खा शि मंडळ संस्थेची मुदत संपली असल्याने निवडणूक लवकर लावण्याचा आग्रह सभासदांकडुन होत आहे.खरे पाहता या मागणीला माझेही पूर्ण समर्थन आहे.तसेच आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असल्याने त्यावेळी संस्थेची निवडणूक घेण्यास अनेक अडचणी येऊ शकतात.त्यामुळे आता या दोन अडीच महिन्यात निवडणूक झाल्यास कोणतीही अडचण राहणार नाही.यासाठीच मी निवडणूक कार्यक्रम तयार करण्याचे आदेश संस्थेला दिले असुन मला निवडणूक कार्यक्रम संस्थेकडून प्राप्त होताच त्याच दिवशी कार्यक्रम घोषित करणार. – जितेंद्र शांतीलाल झाबक, अध्यक्ष-खान्देश शिक्षण मंडळ,अमळनेर


