
अमळनेर : नगरपरिषद आणि खासदार स्मिता वाघ यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहापासून ते तिरंगा चौकापर्यंत एक किमी तिरंगा झेंड्याची भव्य रॅली काढण्यात आली. देशभक्तीच्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. सुमारे पाच हजार विद्यार्थी यात सहभागी झाले होते.
सकाळी ९ वाजता खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात तिरंगा ध्वजाचे पूजन करून रॅलीला सुरुवात झाली. यावेळी उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, मुख्याधिकारी तुषार नेरकर, भैरवी पलांडे, डॉ अनिल शिंदे, डॉ संदीप जोशी, खा शि मंडळाचे संचालक निरज अग्रवाल,माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी , के डी पाटील, माधुरी पाटील, पं स चे माजी सभापती श्याम अहिरे, श्याम पाटील, उपमुख्याधिकारी रवींद्र चव्हाण हजर होते.
नाट्यगृहापासून रॅली निघून मंगलमूर्ती चौक , महाराणा प्रताप चौक , बसस्थानक , पाचपावली चौक मार्गे तिरंगा चौकात आली. एक किमी च्या तिरंग्याने संपूर्ण चौकाला वेढा मारल्याने तिरंगामय वातावरण झाले होते. देशभक्तीपर गीते आणि घोषणांनी परिसर दुमदुमला होता. सुरुवातीला माझी वसुंधरा सामूहिक शपथ घेण्यात आली. त्यांनतर राष्ट्रगीत व राज्यगीत झाले.
रॅलीला संबोधित करताना खासदार स्मिता वाघ म्हणाल्या की आजच्या अभूतपूर्व रॅलीला विद्यार्थ्यांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे अमळनेरकरांच्या मनात देशभक्तिची भावना उफाळून आली. देश अधिक बळकट होण्याकडे वाटचाल सुरू आहे.
रॅलीत नगरपालिका सफाई कर्मचारी, आशा स्वयंसेविका, नगरपालिका शाळा, जी एस हायस्कूल , मुंदडा ग्लोबल स्कूल, आर्मी स्कूल च्या एनसीसीसी विद्यार्थ्यांनी तसेच खान्देश सुरक्षा रक्षक संघटना तसेच इतर शाळा , महिला मंच पदाधिकारी यांनी तिरंगा पळून धरला होता.
रॅलीत धनदायी महाविद्यालय , जययोगेश्वर माध्यमिक विद्यालय , प्रताप महाविद्यालय , भगिनी मंडळ शाळा , लोकमान्य शाळा , सानेगुरुजी कन्या शाळा , डी आर कन्या शाळा , स्वामी विवेकानंद शाळा , नवीन मराठी शाळा , मंगळ ग्रह सेवा संस्था ,प्रा शीला पाटील , शीतल देशमुख , राकेश पाटील , देवा लांडगे , उमेश वाल्हे , महेश पाटील , भारती सोनवणे , करुणा सोनार , नगरपालिका अधिकारी सुनील पाटील , अजित लांडे , कुणाल महाले , सुदर्शन शामनानी , वैद्यकीय अधिकारी डॉ विलास महाजन , किरण कंडारे , संतोष माणिक, गणेश गोसावी , संदीप पाटील , प्रवीण शेलकर , महेश जोशी , लौकिक समशेर , रोहीत रामोळे , कैलास कसाब , विनोद पाटील , प्रवीण बैसाणे , भाऊसाहेब सावंत, चंद्रकांत मुसळे, गणेश गढरी सहभागी झाले होते.
रॅलीच्या पुढे अग्निशमन दलाच्या मोटारसायकली , सजवलेले बंब , ट्रॅक्टर वर विविध वेशभूषा केलेले विद्यार्थी , देशासाठी योगदान दिलेल्या महिलांची वेशभूषा केलेल्या सानेगुरुजी कन्या शाळेच्या विद्यार्थिनी चालत होत्या. लायन्स क्लब , निरज अग्रवाल , नगरपालिका यांच्याकडून बिस्कीट , चॉकलेट , पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सूत्रसंचालन संजय पाटील व अभियंता डिगंबर वाघ यांनी तर आभार मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी मानले.


