
अमळनेर : शासनाच्या अमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियाना अंतर्गत अमळनेर पोलीस स्टेशन तर्फे विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून मंगरूळ येथील स्व आबासो अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालयात नशा मुक्ती अभियान अंतर्गत निबंध स्पर्धा घेण्यात आली. त्याचप्रमाणे शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, संस्थेचे सचिव श्रीकांत पाटील, हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे, पोलीस पाटील भागवत पाटील, मुख्याध्यापक प्रकाश पाटील उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की नशा घेण्याचे प्रमाण शहरी भागातून ग्रामीण भागाकडे वाढत चालले आहे. मुले व्हाईटनर चा नशा करायला लागले आहेत. हळूहळू व्यसन जडले की मुले नशा पूर्ण करण्यासाठी गुन्हेगारी कडे वळू लागले आहेत.
यावेळी शाळेतील २०० मुलांनी नशा मुक्त अभियानावर निबंध लेखन केले. तसेच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या हस्ते शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. सुत्रसंचालन व आभार प्रभुदास पाटील यांनी मानले. कार्यक्रमास अशोक सूर्यवंशी, राजेंद्र पाटील, सुषमा सोनवणे, शीतल चव्हाण, सीमा मोरे, सीमा पाटील,प्रवीण पाटील, मनोज पाटील, सुदर्शन पवार, प्रदीप पाटील हजर होते.




