
अमळनेर :- येथील भावसार क्षत्रिय समाज व अखिल महाराष्ट्र भावसार समाज यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण व गुणगौरव सोहळा रविवार, दि. १५ ऑगस्ट रोजी संत सखाराम महाराज भक्तनिवास, वाडी चौक येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नाशिक येथील दीपक विंधुशेठ सारडा यांनी भूषविले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन परिषदेचे अध्यक्ष परेश शांतिलाल भावसार यांनी केले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विनोद बडगुजर (जावद), किरण मंगल (अ.मा.भा. मंडळ), इंदर बडगुजर (जामनेर), ओमप्रकाश बडगुजर (भुसावळ), चंद्रकांत पाटील (शिक्षक अकोला), अण्णा रामदासराव भावसार (अध्यक्ष अ.मा.भा. समाज), श्रीकांत खंडेलवाल (उपाध्यक्ष, अ.मा.भा. समाज) यांची विशेष उपस्थिती होती.
समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शैक्षणिक गुणगौरव सोहळा घेण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रकासह बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
या प्रसंगी समाजातील मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणाचे महत्व अधोरेखित केले. तसेच समाज एकत्रित राहून मुलांच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन करण्यात आले.




