
आमदार अनिल पाटील यांच्याकडून गृहप्रवेश उद्घाटन
अमळनेर – स्वातंत्र्य दिनानिमित्त अमळनेर शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या घरकुलांना आमदार अनिल भाईदास पाटील यांनी भेट देत गृहप्रवेश कार्यक्रमाचे उद्घाटन केले. हेडावे रोडवरील लाभार्थी बारकू गिरधर पाटील, सुरेखा गोपाल चौधरी आणि अनिल भोई यांच्या घरकुलांचे फित कापून व श्रीफळ वाहून उद्घाटन आमदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे, मुख्याधिकारी तुषार नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, उपमुख्याधिकारी रविंद्र चव्हाण, नगर अभियंता सुनिल पाटील, डिगंबर वाघ, अजित लांडे, नगररचना सहाय्यक मयूर तोंडे, सौरभ बागड, लेखापाल सुदर्शनराज शामनानी, कृणाल कोष्टी, विद्युत अभियंता कुणाल महाले, प्रधानमंत्री आवास योजना अभियंता धीरज पाटील व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी लाभार्थ्यांनी महावितरणविषयी तक्रार मांडली असता आमदार पाटील यांनी तात्काळ संबंधित अभियंत्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून तक्रारी निकाली काढण्याचे निर्देश दिले. तसेच नाशिक विभागात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत वैयक्तिक घरकुले पूर्ण करण्यात अमळनेर पालिका प्रथम क्रमांकावर असल्याबद्दल आमदार पाटील यांनी नगरपरिषदेचे विशेष कौतुक केले.




