
अमळनेर:- 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी नियोजन भवन जळगाव येथे आयोजित नाविन्य पूर्व कार्यक्रमा अंतर्गत पिंपळे खुर्द येथील बालिका स्नेही पंचायत यांची निवड होऊन पालक मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते तसेच खासदार स्मिता वाघ, आमदार राजू भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा परिषद सीईओ मीनल करणवाड यांच्या उपस्थितीत बालिका स्नेही पंचायतचा पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला त्यात पिंपळे खुर्द गावची केलेल्या कामांची दखल घेऊन पुरस्काराची निवड करण्यात आली. जिल्ह्यातून पाच ग्रामपंचायती व तालुक्यातून एक ग्रामपंचायत त्यात अमळनेर तालुक्यातील पिंपळे खुर्द या ग्रामपंचायत यांचे कौतुक केलेले आहे. ग्रुप ग्रामपंचायत पिंपळे खुर्द प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच सौ वर्ष युवराज पाटील उपसरपंच मीना सतीश पाटील व सर्व सदस्य ग्रामसेवक के के लंकेश शिरुड पर्यशिकाअंगणवाडी सेविका लताताई चौधरी निर्मलाबाई चौधरी व सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील पुरुषोत्तम लोटन चौधरी जयवंत पाटील सतीश पाटील यांनी जळगावहून पुरस्कार घेऊनआल्यानंतर त्यांचा सर्वांचा सत्कार गावात करण्यात आला यावेळी कैलासवासी सुकलाल आनंदा माध्यमिक विद्यालय पिंपळे बुद्रुक मुख्याध्यापक संजय भोसले सर व सर्व शिक्षक वृंद यांनीही बालिका स्नेही पंचायत चे सर्व सरपंच उपसरपंच व सर्व सदस्यांचा व सरपंच वर्षा पाटील यांचा सत्कार करण्यात आला




