
अमळनेर :- येथील रहिवासी चि. अनुराग सुनील पाटील याची जेएसडब्लू स्टील कंपनीत पदोन्नती होऊन अवघ्या २६ व्या वर्षी असिस्टंट मॅनेजर पदावरून डेप्युटी मॅनेजर (प्रोजेक्ट) पदी नेमणूक करण्यात आली आहे.
जेएसडब्लू स्टील कंपनीच्या सौजन्याने आणि आयआयटी पवई येथील समिती सदस्य मार्फत एमटेकच्या मोफत शिक्षणासाठी मुलाखत, शैक्षणिक गुणवत्ता व कंपनी जॉब परफॉर्मन्स या आधारे निकष लावून निवड करण्यात आली. अनुराग हा श्री गणेश लॅब चे संचालक,तसेच जायंट्स ग्रूप चे संस्थापक अध्यक्ष सुनील पंडितराव पाटील यांचा तो सुपुत्र असून त्याचे कुटुंबीय व मित्र परिवार तर्फे आणि त्याच्या गुरुवर्य तर्फे अभिनंदन करण्यात आले.




