
अमळनेर:- येथील उज्वल फाउंडेशन यांच्यातर्फे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा निंभोरा येथे शाडू माती पासून पर्यावरण पूरक गणपती बनवण्याची कार्यशाळा संपन्न झाली. त्यात विद्यार्थ्यांर्थी सहभागी झाले व त्यांनी स्वतः तयार केलेल्या गणेश मूर्ती घरी स्थापन करण्याचा संकल्प केला व मूर्ती बनवण्याचा आनंद घेतला.
तसेच उज्वल फाउंडेशनचे सचिव कला शिक्षक दिलीप पाटील सर व शाळेचे मुख्याध्यापक, हेमंत शिंदे सर, प्रदीप महाजन सर, दिनेश अहिरे सर, मोहिनी पाटील मॅडम व अजय शंकरराव न्हाळदे या सर्वांचे सहकार्य लाभले. सदर उपक्रमाचे अध्यक्ष व सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती निंभोरा यांनी कौतुक केले व उज्वल फाऊंडेशनचे सचिव दिलीप पाटील सर यांचे आभार मानले.




