
अमळनेर शिवसेना (उबाठा) कडून तहसीलदारांना निवेदन
अमळनेर:- तालुक्यातील अनेक गावांत दिनांक 15 व 16 तारखेला झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले असून पावसाच्या पाण्याने शेती बुडाली असून व पूर आल्याने पिके जमीनदोस्त झाली आहेत.यात तालुक्यातील नांद्री,पातोंडा,सोनखेडी,दापोरी,खोशी,खेडी,
अमळगाव सह तालुक्यातील अनेक गावांचा समावेश आहे.
पुराच्या पाण्यात जमिनीची माती वाहून गेल्याने शेतातील पिके उघडी पडली असून जमिनी नापीक झाल्या आहेत.तसेच जुलै महिन्यात पाऊसच झाला नसल्याने शेतातील पिके मोठ्या प्रमाणावर करपली असून,उत्पन्नात घट झाली आहे.त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला असून सरसकट पंचनामे करून ई पीक पाहणीची अट रद्द करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी अमळनेर तालुका शिवसेना(उध्दव ठाकरे) यांनी केली आहे.यासाठी आज तहसीलदार अमळनेर यांना निवेदन देण्यात आले.प्रशासकीय यंत्रनेमार्फत आवश्यक ती कार्यवाही करावी अन्यथा शिवसेनेतर्फे उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.निवेदनावर शिवसेना पदाधिकारी शिवसेना शहर प्रमुख चंद्रशेखर भावसार,युवा सेना तालुका प्रमुख राजेंद्र मराठे, विधानसभा क्षेत्र प्रमुख बाळासाहेब पवार,शहर संघटक मोहन भोई,उपतालुका प्रमुख रवींद्र पाटील,उपतालुका प्रमुख विलास पवार, उपतालुका प्रमुख बाळासाहेब पाटील, उपतालुका प्रमुख भय्या पाटील प्रमुख माजी जिल्हाप्रमुख कारभारी आहेर, मा.उपजिल्ला प्रमुख देवेंद्र देशमुख,शाखा प्रमुख मुस्ताक बागवान,रवींद्र पाटील भास्कर पाटील,युवा सेना उपतालुका प्रमुख गोकुळ कोळी, विजय पाटील आदी उपस्थित होते




