
माऊली भजनी मंडळातर्फे भजन,गवळण, भारुड, किर्तनाच्या माध्यमातून केली जनजागृती…
अमळनेर : तालुक्यातील जानवे येथे शंभूराजे गणपती मित्र मंडळात करमणुकीच्या कार्यक्रमांना फाटा देत माऊली भजनी मंडळातर्फे भजन ,गवळण , भारुड ,किर्तनच्या माध्यमातून जनजागृती व प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर करण्यात आले.
गणेशोत्सव सारख्या धार्मिक कार्यक्रमात धांगडधिंगा करण्यापेक्षा प्रबोधनपर , धार्मिक कार्यक्रम घ्यावेत म्हणून गणेश मंडळाने हभप माऊली भजनी मंडळाला निमंत्रित केले होते. भजनी मंडळात मृदुन्गाचार्य पितांबर पाटील , सुरेश कसबे , पेटी मास्तर वाल्मिक पाटील ,भरत पाटील , विणेकरी गोपीचंद पाटील , टाळकरी सहादू पाटील , शिवराम पाटील , बन्सीलाल पाटील , दौलत सोनवणे , विलास पाटील , सुरेश पाटील , गोपाळ पाटील ,नीलकंठ पाटील , फुला पाटील , पुनीलाल पाटील , खंडेराव पाटील , संजय पाटील ,अशोक अहिरे , नन्दलाल पाटील , भाऊराव पाटील आदींनी सहकार्य केले. भजन ,कीर्तन , भारुड , गवळण आदी विविध कार्यक्रम सादर करण्यात आले. जानवे गावात गणेशोत्सवनिमित धार्मिक व भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.




